वृत्तसंस्था /मुंबई
28 जूनपासून बेंगळूरमध्ये दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पश्चिम विभाग संघामध्ये सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये असलेले सलामीचे फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे. पश्चिम विभाग हा दुलिप करंडक स्पर्धेतील विद्यमन विजेता असून या संघाचे नेतृत्व गुजरातचा प्रियांक पांचाळ करत आहे. नुकत्याच झालेल्या 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांची फलंदाज चांगलीच बहरली होती. दरम्यान विंडीजच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघामध्ये जैस्वाल आणि गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता आहे. अलीकडेच इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी जैस्वाल आणि गायकवाड यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील पश्चिम विभागाचा पहिला सामना 5 जुलैला होणार आहे. त्याचप्रमाणे भारत आणि विंडीज यांच्यातील पहिली क्रिकेट कसोटी 12 जुलैपासून डॉम्निका येथे सुरू होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ जुलैच्या पहिल्या आठवड्यात विंडीजला प्र्रयाण करणार आहे.
पश्चिम विभाग संघ- यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, प्रियांक पांचाळ, (कर्णधार), हार्विक देसाई, पृथ्वी शॉ, हेत पटेल, सर्फराज खान, अर्पित वासवदा, अतित सेठ, मुलानी, युवराज दोडिया, धर्मेंद्र जडेजा, चेतन साकारिया, चिंतन गजा, ए. नागवासवाला.









