भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यास उशीर केल्यानंतर जयसिंगपूर दिवाणी न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची आणि इतर साहित्य जप्त करण्याचे आदेश आज सकाळी दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयाचे बिलीफ कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते असता जिल्हाधिकारी कामानिमित्त बाहेर गेल्याने त्यांना ताटकळत बसावे लागले. त्यानंतर अखेर या आदेशाला स्थगिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावर हे सहा वाजता कार्यालयात आले.
तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या एक खटला निकाली काढताना न्यायालयाने हे जप्तीचे आदेश दिले. विकासासाठी भसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला तीस वर्षांपासून दिला नसल्याने आज दिवाणी न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची, लॅपटॉप, गाडी आणि इतर साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले होते. सध्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे काम पाहतात. आज 12 वाजता हे अधिकारी जिल्हाधिकाऱ्याची खुर्ची आणि इतर साहित्य होणार जप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. या आदेशामुळे मात्र सरकारी कार्यालयात खळबळ उडाली होती. कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा जप्तीचा प्रकार पहायला मिळल्याने संपुर्ण जिल्हाभर या जप्तीची चर्चा झाली.
न्यायालयाने दिलेल्या आदेश आंमलात आणण्यासाठी न्यायालयाची वकिल आणि बिलिफ हे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळीच हजर झाले होते. मात्र कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर हे जिल्हा दौऱ्यावर असल्याने राहूल रेखावार हे त्यांच्या सोबत दिवसभर होते. यामध्ये जोतिबा मंदिराला भेट, जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा बैठक यासह अनेक कार्यक्रमाला उपस्थित होते. जिल्हाधिकारी दिवसभर आपल्या कार्यालयात उपस्थित नसल्याने न्यायालयातील कर्मचाऱ्यांना जप्तीसाठी ताटकळत थांबावे लागले. अखेर या निर्णयाला स्थिगिती दिल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्यावरिल नामुष्की टळली.









