शिरोळ प्रतिनिधी
जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी सर्वपक्षीय आघाडीच्या राजश्री शाहू शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले अकरा जागेसाठी 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते सत्ताधारी राजश्री शाहू शेतकरी विकास पॅनलचे सात उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत निकाल घोषित होतात त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळून फटाक्याची आतषबाजी करून आनंदोउत्सव साजरा केला,
जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झाली जयसिंगपूर, शिरोळ, मध्ये दोन तर कुरुंदवाड मध्ये तीन असे सात मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले सेवा सोसायटीचे 1910 मतदारा पैकी 1742मतदारांनी आपल्या मताचा हक्क बजावला तर ग्रामपंचायततिचे 668 मतदारांपैकी 635 मतदारांनीआपल्या मतदानाचा हक्क बजावला एकूण 90% मतदान झाले.
या बाजार समितीची निवडणूक गेल्या पंधरा वर्षापासून बिनविरोध केली जात होती. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील ,भाजपाचे नेते अनिलराव यादव भाजपाची युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव ,शिवसेनेचे वैभव उगळे, या सर्व पक्षाच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले होते. शिरूर तालुका भाजपाचे अध्यक्ष राजवर्धक नाईक निंबाळकर, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ डांगे, मुकुंद गावडे, अभिजीत जगदाळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी भाजप प्रणित शेतकरी विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढवल्याने बिनविरोध निवडीला खो बसला होता.
सत्ताधारी राजश्री शाहू शेतकरी विकास पॅनलचे सोसायटी गटातून विजयी उमेदवार त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणे सुरेश माणगावे, (दानोळी) 1434 रामदास गावडे. (शिरोळ 1474 जामिल पठाण .(आलास) 1417. विजयसिंह देशमुख .(शिरोळ)1444. सुभाषसिंग रजपूत.1363. (आगर )महावीर पाटील. (हसुर)1402. शिवाजी चव्हाण .(शिरोळ),1440. दर्याप्पा सुतार (दतवाड) 1440. चंद्रकांत जोग( कुरुंदवाड) १४८३ अण्णासाहेब पानदारे (अकिवाट) 500 संजय अनुसे( तेरवाड) 546
महिला प्रतिनिधी दिपाली चौगुले, (उदगाव) व माधुरी सावगावे (कुरुंदवाड). सिताराम दत्तू कांबळे (नांदणी) किरण गुरव . (टाकवडे) प्रवीण कुमार बलदवा, (जयसिंगपूर )दादासो ऐनापुरे. (जयसिंगपूर) व भीमराव पाटील ,(जयसिंगपूर बिनविरोध) हे सत्ताधारी आघाडीचे उमेदवार विजयी झाले,,, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रेमकुमार राठोड यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी जे मेश्राम यांनी काम पाहिले.
विरोधी भाजप प्रणित शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार पुढील प्रमाणे व त्यांना मिळालेल्या मते कंसात राजाराम कदम,(221) शशिकांत कोकाटे,(204) अन्वर जमादार, (206,) कलगोंडा पाटील, (245)वैभव कोळी, (259)सुनील देबाजे(,213) दत्तात्रय कोळी.(140) ,सुनील देबाजे,(113) बाबगोंडा पाटील(152) सयाजी पाटील(205),,,