वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 च्या प्रो कब•ाr लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या एलिमिनेटर सामन्यात पाटना पायरेट्सने जयपूर पिंक पँथर्सचा 48-32 अशा 16 गुणांच्या फरकाने पराभव करत एलिमनेटर 2 मध्ये प्रवेश केला. या सामन्यात पाटना पायरेट्स संघातील अयान लोचाबचा खेळ दर्जेदार झाला. त्याने या सामन्यात 20 गुण मिळविले.
पाटना पायरेट्स संघातील खेळाडूंनी या स्पर्धेत आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर जयपूर पिंक पँथर्सला नमविले. पाटना पायरेट्स संघातील अयान लोचाबने 20 गुण नोंदविले. या स्पर्धेत त्याने पाचव्यांदा 20 गुणांची नोंद केली आहे. यापूर्वी असा पराक्रम प्रदीप नरवाल आणि देवांक दलाल यांनी केला होता. जयपूर पिंक पँथर्सतर्फे अल समादीने नोंदविलेला सुपर 10 गुणांचा प्रयत्न वाया गेला.
सामना सुरू झाल्यानंतर अयानने पाटना पायरेट्सचे खाते आपल्या पहिल्याच चढाईवर उघताना जयपूरच्या परविंदरला बाद केले. अयानने आपल्या दुसऱ्या चढाईवर पाटणा संघाला आणखीन एक गुण मिळवून दिला. अयान लोचाबने पहिल्या पाच मिनिटांच्या कालावधीतच जयपूर पिंक पँथर्सचे सर्वगडी बाद केले. पाटना पायरेट्सने यावेळी जयपूरवर 7 गुणांची आघाडी घेतली होती. पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीनंतर पाटना पायरेट्सने जयपूरवर 13-6 अशी बढत मिळविली होती. नवदीपच्या शानदार खेळाच्या जोरावर 14 व्या मिनिटाला जयपूर पिंक पँथर्सचे दुसऱ्यांदा सर्वगडी बाद झाले. अयानने सुपर 10 गुण नोंदविले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत पाटना पायरेट्सने जयपूरवर 30-13 अशी 17 गुणांची भक्कम बढत मिळविली होती. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात जयपूर पिंक पँथर्सतर्फे अल समादीने सुपर 10 गुण नोंदविले. सामना संपण्यास 5 मिनिटे बाकी असताना पाटना पायरेट्सने जयपूवर 41-29 अशी आघाडी मिळविली होती. शेवटची दोन मिनिटे बाकी असताना पाटना पायरेट्सने चौथ्यांदा जयपूर पिंक पँथर्सचे सर्वगडी बाद करुन हा सामना अखेर 48-32 अशा 16 गुणांच्या फरकाने जिंकला.









