वृत्तसंस्था /चेन्नई
2023 सालातील सुरू असलेल्या दहाव्या प्रो कब•ाr लिग हंगामातील दबंग दिल्ली आणि विद्यमान विजेता जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील अटीतटीचा सामना 32-32 असा बरोबरीत राहिला. बुधवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात दबंग दिल्लीच्या आशू मलिकने आपल्या चढायावर सात गुण वसूल केले. दबंग दिल्लीने आठव्याच मिनिटाला जयपूर पिंक पँथर्सचे सर्व गडी बाद केले. दिल्लीचा संघ यावेळी 10-4 अशा गुणांनी आघाडीवर होता. 17 व्या मिनिटाला दिल्लीने दुसऱ्यांदा जयपूरचे सर्व गडी बाद करून 20-10 अशी भक्कम आघाडी मिळवली. मध्यंतरापर्यंत दिल्लीने जयपूरवर 23-11 अशी 12 गुणांची आघाडी मिळवली होती. सामन्याच्या उत्तरार्धात जयपूर पिंक पँथर्सने आपल्या अचूक चढायावर गुण वसूल केले. या कालावधी दिल्लीच्या तुलनेत जयपूरचा खेळ अधिक आक्रमक आणि अचूक झाला. बचावफळीतील अंकूशची कामगिरी दर्जेदार झाली.









