प्रवीण शेरी मालिकावीर, किरण बसरीकोडी सामनावीर
बेळगाव : जैन सेवा संघ आयोजित आनंत कुमार यांच्या स्मरणार्थ जैन मर्यादीत क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एस. आर. वॉरियर्स संघाने नादब्रह्म संघाचा 7 गड्यांनी पराभव करून जैन चषक पटकाविला. प्रवीण शेरी मालिकावीर, किरण बसरीकोळ सामनावीराने गौरविण्यात आले. युनियन जिमखाना मैदानावर जैन सेवा संघ आयोजित मर्यादीत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जैन इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 9 गडी बाद 90 धावा केल्या. त्यात राहुल गौरवण्णाने 2 षटकार 1 चौकारासह 21, महावीर संगोळ्ळीने 17, अक्षित जैन व आदीराज यांनी प्रत्येकी 11 धावा केल्या. नादब्रह्मतर्फे प्रवीण उपाध्येने 9 धावात 3, प्रवीण शेरी, अक्षय पत्रावळी, आदित्य पत्रावळी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना नादब्रह्म संघाने 8.1 षटकात 2 गडी बाद 93 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात प्रवीण उपाध्येने 4 षटकारांसह 33, प्रवीण शेरीने 5 चौकारांसह 32, आनंद करडीने 20 धावा केल्या. जैनतर्फे अक्षित व रोहित यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एस. आर. वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 4 गडी बाद 88 धावा केल्या. त्यात राज जैनने 2 षटकार, 4 चौकारांसह 37, किरण बसरीकोडीने 21, सागर उपाध्येने 10 धावा केल्या. मिट स्मॅशरतर्फे विशाल, भारत, स्वयम व अजय यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मिट स्मॅशरने 10 षटकात 8 गडी बाद 87 धावा केल्या. त्यात विशाल गौरगुंडाने 2 षटकार, 4 चौकारांसह 38, वर्दन पाटीलने 2 चौकारांसह 16 धावा केल्या. एस. आर. वॉरियर्सच्या अमित कुडचीने 3, दक्षित व राज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
अंतिम सामन्यात नादब्रह्मने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 8 गडी बाद 81 धावा केल्या. त्यात आनंद करडीने 1 षटकार, 4 चौकारांसह 28, अक्षय पाटीलने 2 चौकारांसह 20 धावा केल्या. एस. आर. वॉरियर्सतर्फे किरण बसरीकोडीने 2 तर दक्षित, राज व अमित यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एस. आर. वॉरियर्सने 7.5 षटकात 3 गडी बाद 82 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात अजिंक्य शिरगुप्पीने 1 षटकार, 6 चौकारांसह 35 तर किरण बसरीकोडीने 2 षटकार, 1 चौकारांसह 30 धावा केल्या. नादब्रह्मतर्फे आर्यन उपाध्ये, पवन उपाध्ये प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे प्रणव शेट्टी, स्नेहल पाटील, समित इजारे, शितल रामशेट्टी, सुकुमार पद्मण्णवर, सागर सोलापुरकर यांच्या हस्ते विजेत्या एस. आर. वॉरियर्स व उपविजेत्या नादब्रह्म संघाला चषक व पदके देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर किरण बसरीकोडी (वॉरियर्स), उत्कृष्ट फलंदाज आनंद करडी (नादब्रह्म), उत्कृष्ट गोलंदाज राज जैन (वॉरियर्स), प्रविण शेरी (नादब्रह्म) यांना चषक देऊन गौरविले. स्पर्धेसाठी पंच म्हणून सुजित शिंदोळकर व गणेश मुतकेकर, स्कोरर म्हणून रोशन तालबेलकर यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी प्रमोद जपे, अनिल कुडतूरकर, केदारी रामचंद्रण्णावर यांनी समालोचन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अक्षय पत्रावळी, पवन उपाध्ये, अनिल काडवी, मयुर गुडवी, प्रविण शेरी, सुकुमार जरगौडा, युवराज पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले.









