सोशल मीडियावर व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद
क्रिप्टोकरन्सीत पेमेंट स्वीकारणाऱया चहावाल्यापासून युटय़ूब चॅनेल असलेले ऑटोरिक्षाचालक तुम्हाला केवळ बेंगळूर शहरातच आढळून येतील. याचबरोबर बेंगळूरमध्ये अनेक लोकांचे किस्से व्हायरल होत असतात. येथील स्टार्टअप संस्कृती विस्तारत असल्याने देशभरातील तरुण-तरुणी या शहराकडे आकर्षित होत आहेत. अलिकडेच एका फूड ब्लॉगरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका रेस्टॉरंटला अनोख्या शैलीत ग्राहकांना खाद्यपदार्थ सर्व्ह करताना दाखविण्यात आले आहे.

प्रख्यात उद्योजक हर्ष गोयंका हे सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असतात. अलिकडेच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात एका रेस्टॉरंटचे इंटीरियर पाहून युजर्स अत्यंत प्रभावित दिसून येत आहेत. व्हिडिओत फूड ब्लॉगर रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताना दिसुन येतो. या रेस्टॉरंटच्या प्रवेशद्वारावर सेंट्रल जेल असे लिहिले गेले ओ. याचबरोबर रेस्टॉरंटच्या आतील दृश्य एखाद्या तुरुंगाची अनुभूती मिळवून देत आहे. रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना जेलसारखे फीलिंग मिळवून देण्यासाठी इंटीरियरवर चांगली मेहनत घेण्यात आली आहे. रेस्टॉरंटमध्ये लोकांना खाण्यासाठी गजाआड बसलेले पाहता येते. तर वेटर हे पोलीस अन् कैद्यांच्या वेशात समोर येत असतात. व्हिडिओत पोलिसांच्या गणवेशातील कर्मचारी ग्राहकांना खाद्यपदार्थ सर्व्ह करताना दिसून येत आहेत. या अनोख्या संकल्पेनेला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 67 हजारांहुन अधिक ह्यूज मिळाले आहेत. हे रेस्टॉरंट बेंगळूर शहरात असल्याचे समजते.









