क्रीडा प्रतिनिधी/ फोंडा
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तिरंदाजी खेळात वरिष्ठ पुरुष गटात महाराष्ट्रच्या अभिजीत खोपडे, गुजरातच्या जय क्लमयागर व महिला गटात गुजरातच्या त्वीशा ककडझ्या यांनी सुवर्णपदक पटकावले. फोंडा येथील इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरु आहे.
वरीष्ठ पुरुष गटाच्या 54 कि. ग्रॅ. गटात अभिजीतने सुवर्ण, आसामच्या निर्मण कश्dयापने रौप्य तर उत्तराखंडच्या ओम साह व हरियाणाच्या विकासने कांस्यपदक पटकावले. 87 कि. ग्रॅ. गटात जयने सुवर्ण, राजस्थानच्या मनजित सिंगने रौप्य तर नागालँडच्या सुधीर चौहान व सेना दलाच्या प्रमोद जोशीने कांस्यपदक प्राप्त केले. महिलांच्या 46 कि. ग्रॅ. गटात त्वीशाने सुवर्ण, महाराष्ट्रच्या साक्षी पाटीलने रौप्य तर केरळच्या परसीदा कोंब व मणिपुरच्या नावरोइबम देवीने कांस्यपदक मिळविले.









