ऑनलाईन टीम/तरुण भारत
शाहीर साबळे यांचं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ (jay jay maharashtra majha) हे राज्यगीत होणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (minister sudhir mungantiwar) यांनी दिली. हे गाणं राज्य गीत झाल्यानंतर अधिकृत गाणं असलेल्या देशातील निवडक राज्यांच्या यादीत लवकरच महाराष्ट्रा राज्याचाही समावेश होऊ शकतो असंही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्य सरकार राज्याचे अधिकृत राज्य गीत म्हणून अंतिम रूप देण्याच्या तयारीत आहे.
‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे गीत लवकरच राज्यगीत म्हणून घोषित होऊ शकते. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे या गीताची निवड राज्यगीत म्हणून केली जाऊ शकते. सध्या देशातील ११ राज्यांत स्वतःचे राज्य गीत वाजवले जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात शासकीय कार्यक्रमांच्या सुरुवातीला हे गीत वाजवले जाऊ शकते, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे.
जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत होणार असून. या गाण्यातून महाराष्ट्र राज्य, इतिहास आणि संस्कृती आणि उत्सवांचे कौतुक होईल. या विषयावर चर्चा करण्यासाठी मागील महिन्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची ईडी-सीबीआयकडून चौकशी करा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही घोषणा होण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक विभागाने ‘जय जय महाराष्ट्र…’ या गीतासह “बहु असोत सुंदर संपन्न की महा” आणि “मंगल देशा, पवित्र देशा” या दोन गीतांवर विचार केला होता. अखेर शाहीर साबळे यांनी गायलेले जय जय महाराष्ट्र.. या गीताची निवड करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याची माहिती आहे.
दीड मिनिटांत बसेल गीताच्या तीन कडव्यांना कात्री लावण्याची शक्यता आहे. मात्र गीतातील मूळ शब्द बदलले जाणार नाहीत. कार्यक्रमांच्या सुरुवातीला हे गाणे गायले जाईल आणि राष्ट्रगीताने संबंधित कार्यक्रमाची सांगता होईल.