Jai Jai Maharashtra Maza : ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा येत्या 28 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.त्याआधीच या सिनेमातील दोन गाणी आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. दरम्यान काल ‘जय जय महाराष्ट्र माझा’या गाण्याचे लॉन्चिंग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.या गाण्याच्या लॉन्चिंग कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे, संगीत दिग्दर्शक अजय अतुल यांच्यासह अभिनेता अंकुश चौधरीदेखील उपस्थित होता.
शाहीर साबळेंचं हे मूळ गीत अजय गोगावले यांनी गायलं आहे . यामध्ये प्रसाद ओक,आदेश बांदेकर,नागराज मंजुळे,आकाश ठोसर, सिद्धार्थ चांदेकर, स्वप्नील जोशी, शिव ठाकरे, सिद्धार्थ जाधव,भरत जाधव असे अनेक अभिनेते आहेत. या गाण्यातून महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि उत्सवांचा हा कौतुकसोहळा केला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत झळकणार आहे.
‘महाराष्ट्र माझा’ हे मंचावर गायलेलं माझं पहिलं गाणं आहे.आता या सिनेमासाठी हे गाणं मी गायलेलं नाही.या गाण्याला मी योग्य न्याय देऊ शकत नाही असं मला वाटत होतं. त्यामुळे मी हे गाणं गाण्यास तयार नव्हतो. पण ज्या गाण्याने उभं केलं तेच गाणं आता पुन्हा गाताना एक वेगळाच आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया अजय गोगावले यांनी दिली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








