पहिल्या सहामाहीत 2,356 कार्सची विक्री
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जेएलआरच्या कार विक्रीमध्ये डिफेंडर ही सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. भारतातील विक्री दुप्पट झाली आहे. टाटा मोटर्सची मालकी असलेल्या कंपनीने विक्री अहवाल जारी करून ही माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत 2,356 वाहनांची विक्री केली आहे.
रेंज रोव्हर डिफेंडर सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल असून या आर्थिक वर्षात डिफेंडरची 1000 इतकी विक्री झाली आहे. याशिवाय रेंज रोव्हर, रेंज रोव्हर स्पोर्ट आणि डिफेंडर यांना सर्वाधिक मागणी आहे. जेएलआर इंडियाने सांगितले की, सध्याच्या एकूण ऑर्डर बुकमध्ये आठ महिन्यांपेक्षा जास्त विक्रीचा समावेश आहे. कंपनीचा आजपर्यंतचा विक्रीचा हा सर्वोत्तम विक्रम आहे. दुसऱ्या तिमाहीतील विक्रमी विक्रीमुळे ही वाढ झाल्याचे जेएलआरने म्हटले आहे. कंपनीने 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक आधारावर 102टक्केची वाढ नोंदवली आहे.
जेएलआर इंडियाचे प्रशासकीय संचालक राजन अंबा म्हणाले, आमच्या ऑर्डर बुकमध्ये सतत वाढ होणे हे भारतीय ग्राहकांमधील आमचा वाढता आत्मविश्वास दर्शवतो. ग्राहकांच्या गरजा आणि अनुभवानुसार कंपनी नवनवीन उत्पादने बाजारात आणत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.









