2030 पर्यंत भारतीय रस्त्यांवर उतरवण्याची तयारी : रेंज रोव्हर पुढील वर्षी होणार उपलब्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा मोटर्स यांच्या मालकीची जग्वार लँड रोव्हर आता भारतामध्ये आगामी काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची श्रेणी सादर करण्याची तयारी करत आहे. 2030 पर्यंत भारतामध्ये 8 नव्या बॅटरी इलेक्ट्रिक कार्स दाखल करण्याची तयारी कंपनी करते आहे.
देशामध्ये सध्याला यांची जग्वार आय पेस ही इलेक्ट्रिक कार कार्यरत आहे. कंपनीने सांगितले, की पुढच्या वर्षीपासून भारतीय बाजारात रेंज रोवर बीइव्ही (बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल) ही गाडी उपलब्ध होणार असून त्याकरीता पुढच्या वर्षी ऑर्डर घेण्यास सुरुवात केली जाणार आहे. या वाहनाचे वितरण 2025 च्या सुरुवातीला केले जाणार आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत भारतामध्ये किमान आठ बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याची कंपनीची तयारी आहे. 2039 पर्यंत जागतिक स्तरावर टाटा मोटर्सला कार्बनमुक्त व्यवसाय करायचा आहे.
काय म्हणाले मुख्य वाणिज्य अधिकारी
इलेक्ट्रीक वाहनांच्या संदर्भात पाहता बदल स्वीकारण्याप्रती भारताची प्रतिबद्धता पाहता या गटात वाढीची संधी कंपनीला आहे. सुरुवातीच्या काळात अनुदानाचा फायदा कंपनीला उठवता येणार आहे. योग्य संख्येत चार्जिंग केंद्रांची संख्या असणे व उत्तम उत्पादन सादरीकरण या निकषावर इलेक्ट्रिक कार्सचा प्रवास ठरणार आहे, असे जग्वार लँड रोव्हरचे मुख्य वाणिज्य अधिकारी लेनॉर्ड हुर्णिक यांनी सांगितले आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांप्रती आवड ही अनुदानावर ठरणार आहे. भारतीय बाजारात कंपनीला रेंज रोव्हर, रेंज रोव्हर स्पोर्टस व डिफेंडर यासारख्या मॉडेल्सचा विस्तार अधिक जोमाने आगामी करायचा आहे. यावर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत भारतात कंपनीची विक्री ही 100 टक्के वाढीव नोंदली आहे. हीच वाढ आगामी काळात कंपनी नोंदवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.









