जागतिक लिंगायत महासभेचे सरचिटणीस डॉ. शिवानंद जामदार यांची अवहेलना करणाऱ्या आ. श्यामनूर शिवशंकरप्पा यांच्या वक्तव्याचे बेळगाव जागतिक लिंगायत महासभेचे राष्ट्रीय संघटना सचिव ऍड. बसवराज रोट्टी यांनी तीव्र निषेध नोंदविला.
आज बेळगाव शहरातील जागतिक लिंगायत महासभेच्या मध्यवर्ती कार्यालयात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विद्यमान आमदार अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अध्यक्ष श्यामनूर शिवशंकरप्पा यांनी जागतिक लिंगायत सभा कुठे आहे. फक्त जामदार राहिले आहेत. त्यांना मनोरुग्णांच्या इस्पितळात दाखल करायला हवे असे वक्तव्य करून जागतिक लिंगायत महासभेचे सरचिटणीस डॉक्टर शिवानंद जामदार यांची अवहेलना केली होती. वरिष्ठ असलेले श्यामनूर शिवशंकरप्पा यांनी लवकरात लवकर माफी मागावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
या पत्रकार परिषदेत ए वाय भेंडीगिरी, प्रेम चौगुले व इतर उपस्थित होते.