सावंतवाडी प्रतिनिधी
धामणमळा येथील कुलदैवत श्री देवी सातेरी मंदिर येथे श्री देव लिंगेश्वर आधी पंचायतन देवस्थान कालपासून भेटीला गेले आहेत. विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी देवदेवतांची लग्न व सोने लुटण्याचा विधिवत कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दरवर्षी सर्व देवता पालखी मिरवणुकीसह श्रीदेवी सातेरी मंदिराच्या भेटीला जातात . यावर्षी आज बुधवारी 25 ऑक्टोबरला सर्व देवता वाजत गाजत पालखी मिरवणुकीने श्री सातेरी देवीच्या भेटीला गेले आहेत. 25 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत श्रीदेवी सातेरी मंदिर येथे सकाळपासून संपूर्ण दिवसभर जागर केला जाणार आहे. या निमित्ताने सकाळपासून पूजाअर्चा ,दुपारी आरती ,सायंकाळी आणि रात्री भजन, व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. श्री देवी सातेरी मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजवण्यात आला आहे. 25 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या कालावधीपर्यंत या मंदिराकडे ओटी भरणे ,नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत . 29 ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता श्रीदेवी सातेरी मंदिरातून देवता पुन्हा श्री देव लिंगेश्वर मंदिर कडे येणार आहेत . तरी सर्वांनी श्रीदेवी सातेरी मंदिर जागर उत्सवाचा लाभ घ्यावा . असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. याउत्सवामुळे गणशेळवाडी ते धामण मळा सातेरी मंदिरचा परिसर सजून गेला आहे.