वार्ताहर/किणये
तालुक्याच्या विविध गावांमध्ये शिवस्वरूप मंदिरे आहेत. यामध्ये प्रामुख्याने सिद्धेश्वर, कलमेश्वर, रामेश्वर, ब्रम्हलिंग आदी मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये बुधवारी महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त गावागावांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. पिरनवाडी येथील शिवालय मंदिरात(मुक्तिधाम) महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी सकाळी 7 वाजता अभिषेक, होम, आरती करण्यात येणार आहे. सायंकाळी भजन, सातनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.
राकसकोप
राकसकोप येथील भीमसेन टेकडी येथे महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त बुधवारी सकाळी सात वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर ध्वजारोहण व नंदी पूजन करण्यात येईल. सकाळी 9 वाजता तुळस पूजन व गणेश पूजन करण्यात येणार आहे. दहा वाजता वीणा पूजन व भीमसेन पूजन, त्यानंतर विविध गावातील भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. गुऊवारी सकाळी सात वाजता अभिषेक करण्यात येणार आहे. दुपारी बारापर्यंत हरिपाठ होईल. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडोळी येथील कलमेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी महाभिषेक करण्यात येणार आहे. साडेआठ वाजता रखुमाई भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. साडेअकरा वाजता अलतगा येथील मुक्ताई महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, दुपारी तीन वाजता कलावती आईंचे वाराचे भजन करण्यात येणार आहेत. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. गुऊवारी सकाळी 8 वाजता जीवन विद्या मिशन शाखा मंडोळी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी नऊ वाजता ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ मंडोळी यांचा भजन होईल. दुपारी बारा ते तीन पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
बहाद्दरवाडी
बहाद्दरवाडी येथील ब्रह्मलिंग मंदिरात बुधवारी रात्री आठ वाजता अभिषेक करण्यात येणार आहे.त्यानंतर मंदिरात महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. रात्री मंदिरात जागर भजनाचा कार्यक्रम होणार आहे.









