बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ ( राजू ) सेठ यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी प्रचारसभा घेतली.
महांतेशनगर, बेळगाव येथील महांतभवनमध्ये उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ ( राजू ) सेठ यांच्या प्रचारार्थ प्रचारसभा घेण्यात आली. सभेत माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी उत्तरमतदारसंघाच्या आणि राज्याचा विकास साधायचे असेल तर काँग्रेसला सत्तारूढ करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी माजी आमदार फिरोझ सेठ, बेळगाव ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी व इतर प्रमुख उपस्थित होते.










