कोलकाता
भारतीय क्रिकेट संघातून डावलण्यात आलेला पश्चिम बंगालचा यष्टीरक्षक आणि फलंदाज वद्धिमन साहाला बंगाल क्रिकेट संघटनेने शनिवारी ना हरकत दाखला देण्यात आला. तो आता त्रिपुरा संघाकडून खेळण्याची शक्यता आहे.
येत्या ऑक्टोबरमध्ये 38 व्या वर्षांत पदार्पण करत असलेल्या साहाने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 40 कसोटीत भारताचे प्रतिनिधीत्व केले. दरम्यान भारतीय संघाला अधिक वयाचा दुसऱया यष्टीरक्षकाची जरूरी नसल्याचे भारतीय संघव्यवस्थापनाकडून अप्रत्यक्षरित्या सांगण्यात आले होते. त्यानंतर साहाने व्यवस्थापनावर बरीच टीका केली होती.
साहाने पुढे बंगाल क्रिकेट संघटनेकडे एनओसी प्रमाणपत्रासाठी अर्ज संघटनेचे अध्यक्ष अविशेक दालमिया यांच्याकडे केला. या अर्जानंतर बंगाल क्रिकेट संघटनेने साहाला एनओसी मंजूर केले. 2007 साली साहाने हैदराबाद विरूद्ध प्रथमश्रैणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सिलीगुडी येथे जन्मलेल्या साहाने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 122 प्रथमश्रेणी तसेच 102 अ दर्जाचे सामने खेळले आहेत. त्याने 40 कसोटी व 9 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. साहाने बंगाल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.









