वृत्तसंस्था/ चेन्नई
भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू रविंद्र जडेजा आता 2025 च्या रणजी क्रिकेट हंगामात दिल्ली विरुद्ध 23 जानेवारीपासून खेळविल्या जाणाऱ्या रणजी सामन्यात सौराष्ट्र संघाकडून खेळणार आहे. रविवारी जडेजाने नेटमध्ये बराच वेळ सराव केला.
रविंद्र जडेजाने यापूर्वी म्हणजेच 2023 च्या जानेवारी महिन्यात सौराष्ट्र संघाकडून खेळ केला होता. दरम्यान ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत खराब कामगिरीमुळे भारतीय संघावर टिकेची झोड उठवली गेली. दरम्यान कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे फलंदाजीत सपशेल अपयशी ठरले. यानंतर बीसीसीआयने आपल्या नियमांमध्ये अधिक शिस्त आणि कडक अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. शनिवारी घोषित केलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघामध्ये रविंद्र जडेचा समावेश केला आहे. गेल्या वर्षी बार्बाडोस येथे झालेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर रविंद्र जडेजाने टी-20 प्रकारातून निवृत्ती पत्करली होती. सौराष्ट्रने चालू वर्षीच्या रणजी हंगामात आतापर्यंत 5 सामन्यातून 11 गुण मिळविले आहेत.









