जीन-क्लाउड वॅन डेमसोबत केले काम
जॅकलीन फर्नांडिसने एका हॉलिवूडपटात स्थान मिळविले आहे. हॉलिवूड अॅक्शन स्टार जीन क्लाउड वॅन डेमसोबत तिने काम केले आहे. इटलीत या चित्रपटाचे चित्रिकरण पार पडले आहे.
जीन क्लाउड वॅन डेम यासारख्या महान कलाकारासोबत काम करण्यास सक्षम असण्याची कल्पनाच अद्भूत होती. मी एका खऱ्या अॅक्शन हीरोकडे पाहून काम करत होते असे जॅकलीनने म्हटले आहे. माझ्याकडे जीन यांच्या सर्व चित्रपटांचा संग्रह आहे. आम्ही त्यांचे चित्रपट पुन्हापुन्हा पाहायचो. त्यांच्यासोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळेल असा विचार स्वप्नातही केला नव्हता. या चित्रपटात माझी एक उत्तम भूमिका असून यात अॅक्शन, ड्रामा आणि सस्पेन्स सर्वकाही पहायला मिळणार असल्याचे जॅकलीन म्हणाली. यापूर्वी जीन सोबतचे जॅकलीनचे छायाचित्र व्हायरल झाले होते. गायक मीका सिंहने या छायाचित्रावर व्यक्त होत ठक सुकेश चंद्रशेखरसोबतच्या तिच्या कथित प्रेमसंबंधांवर कॉमेंट केली होती. सुकेश सध्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी तुरुंगात कैद आहे. वादानंतर मीका सिंहने कॉमेंट हटविली होती.









