वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सौराष्ट्रचा फलंदाज शेल्डन जॅक्सनने मंगळवारी येथे प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रणजी क्रिकेट स्पर्धेतील गुजरात विरुद्धच्या सामन्यात सौराष्ट्रला पराभव पत्करावा लागल्यानंतर जॅक्सनने निवृत्तीचा निर्णय घेतला.
आपल्या 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 38 वर्षीय जॅक्सनने 105 प्रथमश्रेणी सामन्यात 21 शतके आणि 39 अर्धशतकांसह 7200 धावा जमविल्या आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये जॅक्सनने फलंदाजीत आपले सातत्य राखले होते. 2015-16 साली रणजी करंडक जिंकणाऱ्या सौराष्ट्र संघामध्ये त्याचा समावेश होता.









