वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
ब्रिटनचा सातवा मानांकीत टेनिसपटू जॅक ड्रेपरला दुखापत झाल्याने त्याला 2025 च्या उर्वरित टेनिस हंगामाला मुकावे लागणार आहे. नुकत्याच झालेल्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यात या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.
ड्रेपरच्या डाव्या हाताच्या तळव्याला ही दुखापत झाली असून ती बरी होण्यासाठी काही दिवस लागतील. गेल्यावर्षी अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत ड्रेपरने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. तर विम्बल्डन स्पर्धेत ड्रेपरला दुसऱ्या फेरीत सिलीककडून पराभव पत्करावा लागला होता. अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यात त्याने गोमेझचा पराभव केला होता.









