बॅटरीवर 5 वर्षांची वॉरंटी ः किंमत दीड लाखाच्या आसपास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्युअर कंपनीची नवी इलेक्ट्रिक बाईक इट्रीस्ट 350 ही गाडी नुकतीच लाँच करण्यात आली आहे. सदरच्या बाईकची किंमत 1 लाख 54 हजार रुपये इतकी आहे. सध्याला ही गाडी मेट्रो शहरासह टायर-1 शहरामध्ये विक्रीकरिता उपलब्ध होणार आहे.
मिळणार 140 कि.मी.चे मायलेज
प्युअर इट्रीस्ट 350 ही इलेक्ट्रिक मोटारसायकल चार्ज केल्यानंतर 140 कि.मी. पर्यंतचे अंतर पार करू शकणार आहे. सदरच्या गाडीचा वेग हा 85 कि.मी. प्रति तास इतका आहे. या गाडीमध्ये 3.5 केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी असणार आहे. त्याचप्रमाणे या बॅटरीवर 5 वर्षांची वॉरंटीही दिली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले
आहे.
तीन रंगात येणार 150 सीसीच्या वाहनांच्या स्पर्धेमध्ये सदरची गाडी इतर कंपन्यांशी स्पर्धा करणार आहे. ही मोटारसायकल रेड, ब्लॅक आणि ब्ल्यू या तीन रंगांच्या पर्यायासह ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. सदरची गाडी हैद्राबादच्या कारखान्यामध्ये रचनेसह विकसित केली गेली आहे. याआधी या कंपनीच्या ई ट्रान्स, ई प्लुटो आणि ई ट्राईस्ट अशा इलेक्ट्रिक स्कूटर्स बाजारात आल्या आहेत









