2 सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी सादर
नवी दिल्ली
2 सप्टेंबरपर्यंत 1.55 लाखांहून अधिक अपडेटेड प्राप्तिकर परतावा (आयटीआर) फॉर्म भरले गेले आहेत, अशी माहिती आयटीआर विभागाने दिली आहे. अद्ययावत आयटीआर भरण्यासाठी हा फॉर्म यावर्षी मे महिन्यात अधिसूचित करण्यात आला होता. आयटीआर दाखल करताना करदात्याला देय करासह अतिरिक्त शुल्क भरावे लागणार असल्याची माहिती आयटीआरने दिली आहे.









