पुणे / प्रतिनिधी :
ITI Supplementary Exam on 25th November औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (ITI) 2014 ते 2021 या प्रवेश सत्रात प्रवेश घेतलेल्या, पण परीक्षेत अनुतीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी नवी दिल्लीच्या प्रशिक्षण महासंचालनालयामार्फत अखिल भारतीय व्यवसाय सत्र व वार्षिक पुरवणी परीक्षा 25 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसंदर्भात प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी 10 नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधणे आवश्यक आहे.
वार्षिक पुरवणी परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेकरीता पात्र विद्यार्थ्यांची यादी राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर 10 नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रवेशपत्र 20 ते 25 नोव्हेंबर उपलब्ध होणार आहेत. अधिक माहिती https://ncvtmis.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिकाधिक प्रशिक्षणार्थ्यांनी वार्षिक पुरवणी परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उपसंचालक आर. बी. भावसार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले.
अधिक वाचा : भारत जोडो यात्रा देश जोडणारी; काँग्रेसपुरती संकुचित नाही








