नवी दिल्ली :
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये आयटीसी या कंपनीने 5244 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. वर्षाच्या तुलनेमध्ये पाहता नफ्यामध्ये तीन टक्के वाढ झाली आहे. सदरच्या तिमाहीमध्ये कंपनीने 23,129 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.
एक वर्षाआधी समान अवधीत 19350 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता. महसुलाची वाढ पाहता 19 टक्के इतकी नोंदवली गेली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ करण्यासाठी सिगारेटसह कृषी व्यवसायाची कामगिरी चांगली राहिली आहे. वर्षाआधी समान अवधीत पाहता कंपनीने 5091 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. समूहामधील आयटीसी इन्फोटेक, सूर्या नेपाल आणि आयटीसी हॉटेलसारख्या कंपन्यांनी तिमाहीमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. मागच्या तिमाहीमध्ये ग्राहकोपयोगी वस्तुंची शहरातील मागणी बऱ्यापैकी सुधारलेली दिसली आहे. येत्या काळात मागणीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









