6 ते 9 महिन्यात शक्य : 14 ऑगस्टला बैठकीत निर्णय
मुंबई भारतातील आयटीसी समूहाने आपल्या हॉटेल क्षेत्रातील आयटीसी हॉटेल्सला शेअरबाजारात लिस्टिंग करण्याच्या कार्याला वेग दिला असून आगामी 6 ते 9 महिन्यात लिस्टिंग होण्याची शक्यता सांगितली जात आहे. आयटीसीची संचालक मंडळाची बैठक 14 ऑगस्ट रोजी होणार असून यामध्ये वरील बाबतीत अधिक स्पष्ट चित्र होण्याची अपेक्षा आहे. आयटीसी समूहातून हॉटेल उद्योग स्वतंत्र वेगळा केल्याने या उद्योगाला अधिक विकास साध्य करणे शक्य होणार आहे.
समभागावर परिणाम
याचदरम्यान आयटीसीतून हॉटेल उद्योग स्वतंत्र होणार असल्याच्या बातमीचा परिणाम आयटीसीच्या समभागावर शेअरबाजारात होताना दिसतो आहे. शुक्रवारी 0.18 टक्के घसरणीसह समभाग 455 रुपयांवर बंद झाला होता. 5 दिवसात 2 टक्केपेक्षा अधिक समभाग घसरणीत राहिला आहे. तर एक महिन्यात हा समभाग 4.18 टक्के इतका घसरला आहे. गेल्या वर्षभरात निफ्टीतील सर्वाधिक लाभ मिळवून देणारी कंपनी म्हणून आयटीसीचे नाव घेतले जाते. एक वर्षात जवळपास हा समभाग 46 टक्के इतका वाढला आहे.









