वृत्तसंस्था/ ट्युरीन (इटली)
इटलीचा पुरुष टेनिसपटू जेनिक सिनेरने 12 ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या निटो एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा सिनेर हा चौथा टेनिसपटू आहे. यापूर्वी सर्बियाचा टॉप सिडेड जोकोविच, स्पेनचा अॅलकारेझ आणि रशियाचा मेदव्हेदेव यांनी या स्पर्धेचे तिकीट मिळवले आहे.
रोलेक्स शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यात सिनेरने मार्कोस गिरॉनचा 7-6(7-5), 6-2 असा पराभव केला. या विजयामुळे सिनेरने एटीपी फायनल्स स्पर्धेतील आपले तिकीट निश्चित केले.









