वृत्तसंस्था/ रोटरडॅम
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या रोटरडॅम खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनेरने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना ग्रीसच्या टॉप सिडेड स्टिफॅनोस सात्सिपेसला पराभवाचा धक्का दिला. तसेच नवव्या मानांकित होल्गेर रुनेचे आव्हानही नवोदित ब्रोवेरकडून संपुष्टात आले.
इटलीच्या सिनेरने सित्सिपेसचा 6-4, 6-3, अमेरिकेच्या ब्रोवेरने डेन्मार्कच्या रुनेचा 6-4, 4-0 असा पराभव केला. रुनेने दुखापतीमुळे हा सामना अर्धवट सोडला. कॅनडाच्या अॅलिसिमेने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवताना ग्रेगरी बॅरेरीवर 6-4, 6-3, रशियाच्या सहाव्या मानांकित डॅनिल मेदवेदेव्हने झेंडस्कल्पचा 6-2, 6-2 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले.









