वृत्तसंस्था /गॅस्टेड (स्वीस)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या स्वीस खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीच्या मॅटो बेरेटेनीने एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठताना फ्रान्सच्या गॅस्केटचा पराभव केला.
या स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या एकेरीच्या सामन्यात बेरेटेनीने गॅस्केटचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. बेरेटेनीला या विजयासाठी दीड तास कोर्टवर झगडावे लागले. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात कॅस्पर रुडने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना झेक प्रजासत्ताकच्या लिहेकाचा 6-3, 6-4 असा पराभव केला. बेरेटेनीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना पेद्रो मार्टिनेझबरोबर होणार आहे. या स्पर्धेत कास्पर रुड हा विद्यमान विजेता आहे.









