वृत्तसंस्था/ गॅस्टेड
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या गॅस्टेड खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या मॅटो बेरेटेनीने एकेरीची अंतिम फेरी गाठताना ग्रीसच्या स्टिफॅनोस सित्सिपसचा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला.
बेरेटेनीने उपांत्य फेरीच्या लढतीत सित्सिपसचा 7-6 (8-6), 7-5 असा पराभव केला. 2018 साली बेरेटेनीने ही स्पर्धा जिंकली होती. चालू वर्षीच्या टेनिस हंगामात बेरेटेनीने दोन स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या मॅराकेच टेनिस स्पर्धेत त्याने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. आता बेरेटेनी आणि फ्रान्सचा हॅलेस यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. फ्रान्सच्या हॅलेसने जर्मनीच्या स्ट्रफचा 6-3, 7-6 (7-2) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.









