वृत्तसंस्था/ लंडन
एटीपी टूरवरील क्विन्स क्लब ग्रास कोर्ट पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या मॅटेव बेरेटिनीने एकेरीची अंतिम फेरी गाठताना हॉलंडच्या बोटीक झेंडस्कल्पचा पराभव केला.
2022 च्या टेनिस हंगामात इटलीच्या बेरेटिनीने ग्रासकोर्टवरील स्पर्धेत सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेरेटिनीने बोटीकचा 6-4, 6-3 असा पराभव केला. गेल्यावर्षी दहाव्या मानांकित बेरेटिनीने विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. बेरेटिनीने ग्रासकोर्टवरील स्पर्धेत अलिकडच्या कालावधीत 20 पैकी 19 सामने जिंकले आहेत. बेरेटिनी या स्पर्धेतील माजी विजेता आहे. सिलीक आणि क्रेसीनोव्हिक यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर त्याची अंतिम फेरीत गाठ पडेल.









