मित्राला अटक; तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू
पुणे
पुण्यातील विमाननगर येथील डब्ल्यूएनअस या आयटी कंपनीत काम करणाऱ्या मित्राने मैत्रिणीवर धारदार चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी इमारतीच्या पार्कींगमध्ये ही घटना घडली.
कात्रजच्या बालाजीनगर येथील शुभदा शंकर कोदारे (वय २८ ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी शिवाजीनगर कात्रज येथील खैरेवाडीचा आहे.
शुभदा आणि कृष्णा हे दोघेही एकाच कंपनीमध्ये काम करत होते. शुभदा आणि आरोपी कृष्णा एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत होते. शुभदाने कृष्णाकडून काही रक्कम उधार म्हणून घेतली होती. आणि हे पैसे परत देण्यासाठी ती टाळाटाळ करत होती. यावरून सोमवारी या दोघांच्या वादावाद झाली. आणि इमारतीच्या पार्कींगमध्ये कृष्णाने धारदार चाकूने शुभदावर वार करून खून केला.
तेथील सुरक्षारक्षकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र रात्री साडे नऊच्या सुमारास उपचारादरम्यान शुभदाचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी कृष्णाला अटक केली असल्याची माहिती, पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
Previous Articleसिंधुदुर्ग प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर
Next Article लोकवर्गणीतून सावंतवाडीसाठी रुग्णवाहिका घेणार








