ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंजाबमध्ये सत्ता परिवर्तन झालं. त्यांनतर मुख्यमंत्री भगवंत मन यांनी अनेकांच्या सुरक्षा काढून घेतल्या. यामध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) याचाही समावेश होता. सुरक्षा काढून घेतल्याच्या एक दिवसांनंतर मुसेवालाची पंजाबच्या (Punjab) मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी २९ मे २०२२ रोजी त्याच्यावर गोळीबार केला. यामध्ये मुसेवालाचा मृत्यू झाला. यांनतर देशभरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, आता मुसेवालाचे वडील बालकर सिंग यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे काही जवळचे मित्र आणि राजकारणी यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. तसेच या लोकांची नावं लवकरच जग जाहीर करणार असल्याचं सिंग यांनी सांगितलं आहे.
“सिद्धू कमी वेळात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्याने काही जणांना सहन झाले नाही. यामुळेच त्यांनी त्याची हत्या केली. या प्रकरणात सरकारचीही दिशाभूल करण्यात आली” असा आरोप बलकर सिंग यांनी केला आहे. काही लोकांची इच्छा होती की सिद्धूने त्याच्या कारकीर्दीतील सर्व व्यवहार त्यांच्यामार्फत करावेत. मात्र, सिद्धू हा स्वतंत्र होता. हेच त्यांना मान्य नसल्यानं त्यांनी त्याला संपवल्याचं बलकर सिंग म्हणाले.
२९ मे २०२२ रोजी पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात सिद्धू मुसेवालांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धूवर एकाचवेळी तब्बल ३० गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटातच घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला.