ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेना संपविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच खा. संजय राऊत यांना सुपारी दिली होती. आता पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यामुळे संतापलेले शिवसैनिक चोपून काढतील, अशी भीती राऊत यांना आहे. ठाकरेंची जी परिस्थिती झाली, त्याला संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे.
नरेश म्हस्के म्हणाले, शिवसेना संपविण्यासाठी पवारांच्या स्क्रिप्टनुसार राऊत यांनी सगळा डाव बनवला होता. आता राऊत मातोश्रीमध्ये वजन वाढविण्यासाठी सकाळी, दुपारी प्रेस घेऊन मुख्यमंत्र्यांवर बोलत असतात. मग अजित पवारांचे पुतळे जाळण्यासाठी जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांना फोन कशासाठी केले. कायम अजित पवारांवर ठपका ठेवायचा होता का? हे पण त्यांनी समजून घेतले पाहिजे.
दरम्यान, खा. श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी गुंड राजा ठाकूर यांना दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. मात्र, हा आरोप बिनबुडाचा आहे. पोलीस त्यांचा जबाब घ्यायला गेल्यावर त्यांनी काहीही सांगितलं नव्हतं, असेही मस्के म्हणाले.








