प्रतिनिधी /म्हापसा
आम्ही कारणास्तव भाजप पक्षातून इतरत्र गेलो ही गोष्ट खरी आहे पण मला वाटते वैयक्तिकरित्या कुणीही भाजप पक्ष सोडून जाऊ नये. आपण भाजप पक्ष सोडून गेलो ती आपली मोठी चूक होती अशी माहिती कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. जी आमच्याकडून चूक झाली ती मान्य करायला हवे आणि ती मान्यही केली आहे असे लोबो म्हणाले.
तुमचे कुणाकडे मतभेद असतील तर तो राग पक्षाकडे नको. आमचे केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांचे कुणाकडे मतभेद असणार तर त्यांनी कधीही पक्षाचा त्याग केलेला नाही. नंतर ते अध्यक्षही झाले. पक्षात वरखाली असते. जी चूक झाली ती मान्य करून आम्ही पुन्हा पक्षात आलो असे ते म्हणाले. आम्ही पक्ष बदलला तरी कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला असे आपण म्हणणार नाही. लोकांच्या सुखदुःखात आम्ही सदैव असतो. कार्यकर्ते भाजपा पक्षाबरोबर सदैव असतात. भाजप, काँग्रेस, आप आदी सर्व कार्यकर्ते आमच्याबरोबर निवडणूक मतदानवेळी ते आम्हालाच मत देतात.
प्रधानमंत्र्यामुळे सर्व शक्य
आज आठही काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपात आले यात विरोधक कुणी राहिलाच नाही, हा लोकशाहीचा खून असे आपल्यास वाटत नाही काय? यावर बोलताना लोबो म्हणाले की, काँग्रेस पक्षाकडे 3 आमदार आहे, पक्ष आहे. पक्ष कधीच संपत नाही. आज जो पंतप्रधानाचा दूरदृष्टीकोन आहे, जी जागृती पुढे नेण्यची घरोघरी पोचल्याची ही चांगली आहे म्हणून आज राज्यपाल प्रत्येक पंचायतीमध्ये जातात त्यांच्या समस्या ऐकून घेतात. गऱहाणे ऐकतात. ते सांगतात लोकांसाठी काम करा, आपल्या ज्या विविझ योजना आहेत त्या सांगतात. गरीब लोकांसाठी स्वतःहून योजना तयार केली आहे ती सांगतात. गोरगरिबांच्या योजना घरोघरी पोचविण्यासाठी ते सांगतात. हे सर्व पंतप्रधानमुळे शक्य झाले आहे अशी माहिती लोबो यांनी दिली.
भाजप पक्ष पराभूत उमेदवारांचाही सन्मान करतो
सध्या सर्वांच्या भाजप प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये फिरताना गोंधळ होत नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला असता लोबो म्हणाले की, काही दिवस या समस्या असतात. अखेर आमदार तो आमदार असतो. पराभूत होते त्यालाही मान सन्मान असतो. त्याला काढून आम्ही बाजूला ठेवत नाही. भाजपा सर्वांना मान देतो ते सर्वजण एकमेकांना मिळून काम करणार आहे.
आता कळंगूटमध्ये कित्येक प्रतिनिधी आहे. अँथोनी मिनेझीस, जोसेफ सिक्वेरा आम्ही सर्व एकत्रित काम करावे. एकत्रित काम करणार तेव्हा सर्वांची कामे होणार. आपण पराभूत झालो आपण लिडर याचा विचार करू नका. तसे झाल्यास लोकांची कामे होणार नाही.
मंत्री विश्वजीत राणेचा आरोप वैयक्तिकरित्या आमच्या व्यवसायाशी होता
गोवा राज्यात ईडी आदी काही नाही आहे तर इनकम टॅक्स. ईडी म्हणजे प्रॉपर्टी घोटाळा. येथून पैसे विदेशात पाठवले आदी येथे सर्व काही खुले आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही प्रमाणपत्र निवडणूक अधिकाऱयाकडे सुपूर्द करतो. ते कुणीही तपासू शकता. काही जण नाहक आरोप करतात त्यावर विश्वास ठेवू नये. असाच आरोप नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी आपल्यावर केला होता. तो कुठेतरी यापुढे बंद होणार काय? या प्रश्नावर बोलताना लोबो म्हणाले, त्यांनी आमच्या व्यवसायावर आरोप केला. ते तात्पुरते बांधकाम होते आणि आम्ही काढलेही. व्यावसायावर आरोप होता.
देवाकडे घेतलेल्या शपथकडे मायकल लोबोंची घुमजाव
आम्ही राजकीय पक्ष तयार करणार तेव्हा आम्ही तो पक्ष सोडून जाणार नाही अशी शपथ घेतली होती. पाहिजे असल्यास ती पडताळून पाहावी. राज्यातील जनतेने आम्हीला 21 दिला नाही. 18 वा 16 ही निवडून दिले नाही तर येथे शपथीचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही देवाला मानतो. सर्वजण मानतात. शपथ काय होती आम्ही राजकीय पक्ष जे लोक आम्हाला संख्याबळ पक्षासाठी देणार. गेल्यावेळी आम्हाला 17 दिले. 3 मगो, 3 अपक्ष, 3 गोवा फॉरवर्ड होते तरी सरकार न करता तेथून फुटले. त्यांना जनतेने कौल दिले होते ते आम्हाला दिले नाही. 11 म्हणजे कौल नाही. आम्ही पंतप्रधानाचा दूरदृष्टीकोन घेऊन शेवटच्या घरापर्यंत पोचलो तर पुढे भाजप स्वबळावर निवडणुका जिंकून येणार यात शंकाच नाही. जनता आम्हाला मत देणार असे आमदार मायकल लोबो म्हणाले.









