शिवसेनेशी बंडखोरी करून भाजपशी युती करून सरकार स्थापन करणारे एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनीच खरी भाजप- शिवसेनेची BJP-Shiv Sena alliance 25 वर्षांची युती तोडली असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राउत Sanjay Raut यांनी केला. भाजपबरोबर युती तोडण्यास आणि शिवसेना फोडण्यास सर्वस्वी एकनाथ शिंदेच जबाबदार असल्याचे त्यांनी खुलासा केला. ते एबीपी या खाजगी वाहिनीला मुलाखत देताना बोलत होते.
शिंदे गटाक़डून शिवसेना -भाजप युती संजय राउतांमुळे फुटली असा आरोप सातत्याने राउतांवर होत आहे. यावर भाष्य करताना संजय राउत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टिका करून ही युती तुटायला आणि शिवसेना फुटायला एकनाथ शिंदेच जबाबदार आहेत.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर आणि शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचे सांगत होते. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला छळ होतोय असे जाहीरपणे सांगून राजीनामा दिला होता. त्यानंतरच भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याची आठवण त्यांनी करून दिली.
भाजपासोबतची युती तुटल्यानंतर महाविकास आघाडी अस्तित्वात येऊन शिवसेनेत बंडखोरी निर्माण होण्यास राउत जबाबदार असल्याच्या आरोपांचा समाचार घेताना ठाकरे गटाचे खासदार म्हणाले, “सगळे विरोधक खोटं बोलत असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राजीनामा द्यायला निघालेले पहिले मंत्री एकनाथ शिंदे हेच होते. फडणवीस सरकारमध्ये आमचा छळ होतोय, असं जाहीरपणे सांगून फडणवीस सरकारमधून पहीला राजीनामा मंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिला होता. भाजपाबरोबर आम्हाला राहायचं नाही…आम्हाला मोकळं करा…असं त्यावेळी एकनाथ शिंदेंनीच जाहीरपणे सांगितलं होतं.” असा खुलासा खा. संजय राऊत यांनी केला.
Previous Articleआ. संतोष बांगर यांची प्राचार्यांना मारहाण
Next Article टिप्पर-ट्रॅक्टरमध्ये भीषण धडक ; एक जण जागीच ठार








