ऑनलाईन टीम / तरुण भारत :
खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीतच भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं होतं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.
आ. शेळके म्हणाले, रविवारी अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडली. ही बैठक सत्तेत जाण्यासाठी आहे, असे अजित पवारांनी स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे ही बैठक प्रदेशाध्यक्षपदासाठी होती असं नाही. या बैठकीला प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. सुप्रिया सुळेही बैठकीदरम्यान काही वेळ उपस्थित होत्या. त्या पक्षाच्या कार्याध्यक्ष असल्याने सत्तेत जायचं हे शरद पवार यांना विचारावं असं आम्हाला वाटत नव्हतं. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला.
राज्याच्या विकासासाठी, लोकहिताची कामं करण्यासाठी आपण सत्तेत असणं महत्वाचं होतं. सत्तेत राहायचं म्हणून आम्ही त्यांना सह्या दिल्या अन् त्याच दिवशी दुपारी अचानक शपथविधीचा कार्यक्रम झाला, असेही शेळके यांनी सांगितले.








