रिंगरोड विरोधात चाबूक मोर्चासाठी विविध गावांमध्ये जनजागृती, हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा शेतकऱयांनी केला निर्धार
वार्ताहर /किणये
विकासाच्या नावावर प्रशासनाने शेतकऱयांच्या सुपीक जमिनी बळकावण्याचा घाट घातला आहे. रिंगरोडच्या प्रस्तावाला तालुक्मयातील शेतकऱयांनी आपला तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यानुसार रिंगरोडला विरोध दर्शविण्यासाठी शेतकऱयांनी आपल्या हरकती नोंद केल्या आहेत. येत्या 28 रोजी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून रिंगरोडच्या विरोधात चाबूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चा संदर्भात सध्या तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
शनिवारी रात्री पश्चिम भागातील संतिबस्तवाड व कर्ले या ठिकाणी शेतकऱयांच्या जनजागृती बैठका घेऊन रिंगरोडला विरोध दर्शविण्यात आला आहे. 28 रोजीच्या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार शेतकऱयांनी केला आहे. सुपीक जमीन व शेती वाचविणे हे प्रत्येक शेतकऱयाचे कर्तव्य असून, कोणत्याही परिस्थितीत बेळगाव परिसरात रिंगरोड होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार शेतकऱयांनी केला आहे.
संतिबस्तवाड गावात जनजागृती बैठक
शनिवारी रात्री संतिबस्तवाड गावात जनजागृती बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी ऍड. प्रसाद सडेकर होते. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, ऍड. शाम पाटील, ऍड. एम. जी. पाटील, आर. आय. पाटील, आर. एम. चौगुले, मेघो बिरजे आदींनी शेतकऱयांना मार्गदर्शन केले. या परिसरातून मोठय़ा संख्येने मोर्चामध्ये सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार एकमताने उपस्थित शेतकऱयांनी घेतला.
यावेळी बाळू पाटील, बाळू नाईक, मारुती हुंडेकर, निंगाप्पा मेलगे, मल्लाप्पा गुज्जनवर, हनुमंत संजीवनी, आप्पाजी चन्नेकोपी, बाबू अनगोळकर, चुडाप्पा होनगेकर आदींसह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
शेतकऱयांच्या सुपीक जमिनी हिसकावून घेण्याचे कुटिल कारस्थान सरकारने रचलेले आहे. याला शेतकऱयांनी बळी न पडता एकजुटीने रिंगरोडला विरोध करून प्रस्ताव रद्द करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मनोगत प्रसाद सडेकर यांनी व्यक्त केले.
कर्लेत चाबूक मोर्चा संदर्भात जनजागृती बैठक
कर्ले येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात शनिवारी सायंकाळी रिंगरोडविरोधी चाबूक मोर्चा संदर्भात जनजागृती बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक एम. व्ही. शेळके होते. सुपीक जमीन वाचविण्यासाठी शेतकऱयांनी आता गप्प राहून चालणार नाही, असे मनोगत पुंडलिक तारीहाळकर यांनी व्यक्त केले.
रिंगरोडच्या नावावर शेतकऱयांच्या जमिनी बळकाविल्यास शेतकऱयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे आत्ताच रिंगरोडला विरोध केला पाहिजे, असे विनायक पाटील यांनी सांगितले. तालुक्मयात रिंगरोड झाल्यास रिंगरोडच्या आतील जमीन ही प्रशासन विविध शासनाच्या कामासाठी नक्कीच बळकाविणार..त्यामुळे शेतकऱयांनी वेळीच जागृत होणे ही काळाची गरज आहे, असे आर. आय. पाटील यांनी सांगितले. तालुका म. ए. समिती ही नेहमीच शेतकऱयांच्या पाठीशी आहे, असे आर. एम. चौगुले यांनी सांगितले. लढा हा तीव्र केला पाहिजे. त्यासाठी आपल्या भागातील जास्तीत जास्त ट्रक्टर घेऊन शेतकऱयांनी 28 रोजीच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे शाम पाटील यांनी सांगितले. शिवाजी सुंठकर व मनोहर किणेकर यांनी शेतकऱयांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सी. ए. सांबरेकर यांनी केले. यावेळी बाळू कुंदप, नवनाथ खामकर, ग्रा. पं. सदस्य वसंत सांबरेकर, स्नेहल लोहार, रंजना भास्कर आदींसह शेतकरी उपस्थित होते.









