पुणे / वार्ताहर :
पुण्यातील एका शाळेत ‘गुड टच बॅड टच’च्या अनुषंगाने मुलींच्या समुपदेशनासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या चौकशीत एका दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीवर सात वर्षापूर्वी म्हणजेच तिसरीत असताना एकाने घरी बोलवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत 21 ते 22 वर्षाच्या मुलावर उत्तमनगर पोलीस ठाण्यात 15 वषीय शाळकरी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी ही तिच्या कुटुंबियांसोबत उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास असून, जवळील एका शाळेत शिकण्यास आहे. त्याच्या शाळेत ‘गुड टच आणि बॅड टच’च्या अनुषंगाने समुपदेशन सुरू असताना, दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने आपली व्यथा समुपदेशनासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यापुढे मांडली. 2015 मध्ये सात वर्षापूर्वी ती इयत्ता तिसरीत शिकत असताना तिच्या ओळखीच्या असलेल्या आरोपीने तिला त्याच्या घरात बोलवले होते. त्यावेळी त्याने तिच्याशी अश्लील चाळे करून तिच्याशी बलात्कारासारखा अत्याचाराचा प्रकार केल्याचे सांगितले. संबंधीत समुपदेशकांना तिने हा घडलेला प्रकार सांगितल्यानंतर मुस्कान संस्थेच्या माध्यमातून पीडित मुलीच्या कुटुंबियांना माहिती दिल्यावर, याबाबत उत्तमनगर पोलीस ठाणे गाठून तिने तिच्यावर झालेल्या लैगिक अत्याचाराबाबत फिर्याद पोलिसांना दिली. संबधित तरूणावर आता बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : पुत्रप्राप्तीसाठी अघोरी पूजा, पत्नीला सर्वांसमोर करायला लावली आंघोळ









