वृत्तसंस्था / अहमदाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्यानेच महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षणाचे विधेयक संसदेत संमत होऊ शकले आहे. पंतप्रधान मोदी यांनी नूतन संसद भवन, चांद्रयान-3 अभियान, जी-20 परिषदेचे यशस्वी नेतृत्व आणि महिला विधेयक ही चार महत्वाची कार्ये अवघ्या तीन महिन्यांमध्ये केली. या सर्व कामांमध्ये त्यांच्याच पुढाकाराने यश मिळाले, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्रंाr अमित शहा यांनी येथे केले आहे.
ते शनिवारी येथे एका जाहीर सभेत बोलत होते. जे काम करण्यासाठी विरोधकांनी 50-50 वर्षे घेतली आहेत, ती कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढकाराने आणि प्राधान्यक्रमामुळे अतिशय कमी वेळात झाली. ते केवळ राजकारणातच लक्ष घालतात असे नव्हे, तर शास्त्रज्ञांचा उत्साह वाढविण्याचे कामही ते करतात. चांद्रयान-3 हे अभियान याचे द्योतक आहे. महिलांना आघाडीवर ठेवून प्रगती हे त्यांचे तत्व असून त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या 9 वर्षांच्या काळात महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना लागू केल्या आहेत. ज्यांच्या संदर्भात विरोधकांनी केवळ चर्चात्मक कार्यक्रम केले ती कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष करुन दाखविलाr आहेत, असेही प्रतिपादन अमित शहा यांनी केले.









