बेळगाव – मकर संक्रांतीचा पर्व जवळ आला कि, बेळगाव शहर व परिसरात शबरीमलै स्वामी अय्यप्पाची आराधना सुरु होते. पार्वती व परमेश्वराचे सुपुत्र असलेले मणिकंठाच्या दर्शनासाठी बेळगावहून देखील हजारो भाविक केरळला जातात तर त्या साठी रेल्वे खात्याने नवीन सोय सुरु केली आहे.नैऋत्य रेल्वे खात्याने स्वामी अय्यप्पा यांच्या भाविकांना शबरीमलै अय्यप्पास्वामीचे दर्शन घेण्यासाठी बेळगावच्या खासदार मंगल अंगडी यांच्या विनंतीनुसार, रेल्वे मंत्रालयाने सबरीमालाला जाणार्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी विशेष रेल्वेसेवा सुरु केली आहे . खासदार मंगल अंगडी यांनी सालूमरदा थिम्मक्का यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखून नवीन रेल्वे सेवेला चालना दिली . बेळगाव-कोल्लम ट्रेन (07357/07358) बेळगावहून 20 नोव्हेंबर (07357) सकाळी 11:30 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी (२१ नोव्हेंबर) दुपारी ३:१५ वाजता कोल्लमला पोहोचेल हीच गाडी (07358) 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:10 वाजता कोल्लमहून सुटून दुसऱ्या दिवशी (22 नोव्हेंबर) रात्री 11 वाजता बेळगावला पोहोचेल त्याचप्रमाणे 4 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालावधीत बेळगाव-कोल्लम विशेष एक्सप्रेस गाडी (07361) दर रविवारी सकाळी 11.30 वाजता बेळगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3.15 वाजता कोल्लमला पोहोचेल. कोल्लम – याच मार्गाने परतणारी बेळगाव स्पेशल एक्स्प्रेस (07362) 5 डिसेंबर ते 16 जानेवारी दरम्यान दर सोमवारी संध्याकाळी 5:10 वाजता कोल्लमहून सुटेल.त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजता बेळगावला पोहोचेल.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









