वेव्हज शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
मुंबई : आपल्याला मनुष्याला रोबोट बनवायचे नाही. आपल्याला माणसाला अधिकाधिक संवेदनशील आणि समफद्ध करायचे आहे. आज आपल्या यंग विचाराला मानवताविरोधी विचारापासून वाचवले पाहिजे. वेव्हज हे काम करू शकतं. या जबाबदारीपासून मागे हटलो तर युवा पिढीसाठी ते घातक ठरेल, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी वेव्हज शिखर परिषदेत तरुणाईचे भवितव्य अधिक उज्ज्वल करण्यावर भर दिला. मुंबईतील बीकेसी येथे जिओ कनव्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित शिखर परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. वेव्हज शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत काय बोलतील याबाबत याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र त्यांनी तरुणाईला मानवताविरोधी विचारापासून वाचवले पाहिजे. वेव्हज हे काम करू शकते, असे म्हणत प्रत्यक्ष त्या घटनेचा उल्लेख न करता अप्रत्यक्षरीत्या द्यायचा तो सल्ला दिला. या ग्लोबल समिटवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना ‘वेव्हज फक्त समिट नाही, तर ती एक लाट आहे, असे गौरवोद्गार काढले. ते मुंबईतील जिओ कनव्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित शिखर परिषदेत बोलत होते.
चारही दिशांनी शुभ विचार
आपल्याकडे हजारो कथा आहेत. त्या कथांमध्ये सायन्स आहे. या कथा लोकांसमोर मांडणे ही व्हेवजची मोठी जबाबदारी आहे. आपल्याकडे पद्म पुरस्कार स्वातंत्र्यानंतर काही दिवसानंतर सुरू झाले. इतक्या वर्षापासून हे पुरस्कार दिले जात आहे. आम्ही या पुरस्कारांना पिपल्स पद्म केले आहे. देशभरात समाजाची सेवा करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा दिली आहे. आता तो कार्यक्रम देशाचा उत्सव झाला आहे. तसेच वेव्ह आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात जे टॅलेंट आहे, त्याला प्लॅटफॉर्म दिले तर जगही त्याचे कौतुक करेल. चारही दिशांनी आपल्याकडे शुभ विचार आले आहेत. हे आपल्या सिव्हिलायझेशन ओपननेसचे प्रमाण आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. ‘या ग्लोबल कनेक्टने आपल्या व्हिजनला अर्थ प्राप्त होईल. तुम्हाला क्रिएट इन इंडियाचा मंत्र सोपा वाटेल. भारतात ऑरेंज इकोनॉमीचा उदय होत आहे. कंटेट, क्रिएटिव्हीटी आणि कल्चर हे ऑरेंज इकोनॉमीचे तीन स्तंभ आहेत.
भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ’जीडीपी‘मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अॅनिमेशन मार्पेट 430 अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील 10 वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे यशाचे दार उघडले जात असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आज 100हून अधिक देशात भारतीय सिनेमा रिलीज होतात. फॉरेन ऑडियन्स केवळ भारतीय सिनेमा पाहत नाही तर तो समजून घेत आहे. क्रिन मायक्रो होत आहे, पण मेसेज मेगा होत आहे. भारत फिल्म प्रोडक्शन, संगीत, फॅशनचा ग्लोबल हब होत आहे, असेही त्यांनी सांगितले. भारतीय खाद्यपदार्थ जगाची पसंत होत आहे. भारताचे गाणेही जगाची ओळख बनेल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.
माणसाला अधिकाधिक संवेदनशील आणि समफद्ध करायचं
सध्याच्या परिस्थितीबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात टेक्नॉलॉजीची भूमिका वाढत आहे. अशावेळी मानवीय संवेदना कायम ठेवण्यासाठी एक्स्ट्रा एफर्टची गरज आहे. ते क्रिएटिव्ह वर्ल्डच करेल. आपल्याला मनुष्याला रोबोट नाही बनवायचे. आपल्याला माणसाला अधिकाधिक संवेदनशील आणि समफद्ध करायचे आहे. व्यक्तीची समफद्धी ही माहिती जगताच्या पर्वतातून येणार नाही, टेक्नॉलॉजीतून येणार नाही त्यासाठी आपल्याला गीत, संगीत, कला, नफत्याला महत्त्व द्यावे लागेल. त्यांनीच हजारो वर्षापासून मानवीय संवेदनाला जागफत ठेवले आहे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.









