जन्मानंतर करतात बाळाची हत्या
अनेक लोकांना स्वतःचे मूल गोरं, गुटगुटीत व्हावं अशी इच्छा असते. परंतु या गोष्टी गुणसूत्रांवर अवलंबून असतात, काही उपायांमुळे मूल गोरं जन्माला येतं असा काहींचा समज असतो. तर दुसरीकडे भारतात एका ठिकाणी गोरं बाळ जन्माला येणे अशुभ मानले जाते. गोरं बाळ जन्माला आल्यावर तेथे क्रूरपणे त्याची हत्या केली जाते.

अंदमान बेटावर ही क्रूर परंपरा पाळली जाते. अंदमानमधील जारवा आदिवासी जमातीच्या लोकांमध्ये आजतागायक ही क्रूर आणि विचित्र परंपरा पाळली जाते. ही जमात जगातील सर्वात जुन्या आदिवासी जमातींपैकी एक आहे. जारवा समुदायामध्ये गोरं बाळ जन्माला येथे अशुभ मानले जाते.
जारवा या जमातील लोकांची त्वचा काळय़ा रंगाची असते. या समुदायामध्ये एखाद्या महिलेने गोऱया बाळाला जन्म दिला तर त्याचा जीव घेतला जातो. हे जन्मलेले मूल दुसऱया जमातीचं असल्याचे मानून त्या नवजाताची क्रूरपणे हत्या केली जाते.
जारवा जमात ही 90 च्या दशकात सर्वप्रथम नजरेत आली होती. परंतु भारत सरकारने या जमातीची छायाचित्रे काढणे किंवा ती सोशल मीडियावर अपलोड करण्यासंबंधी कठोर कायदे केले आहेत. या जमातीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केली तर त्याला तुरुंगात जावे लागू शकते आणि दंडही होऊ शकतो.
जारवा समुदायात अंधश्रद्धेची मूळे खूप खोलवर रुजली आहेत. गरोदर महिलेला प्राण्याचे रक्त पाजल्यास तिचे मूल काळे होईल अशी येथील लोकांमध्ये मान्यता आहे. इथे फक्त काळय़ा रंगाच्या मुलांनाच समाजात राहण्याची मान्यता मिळते. जारवा समुदाय आजही मुख्य प्रवाहातील समाजापासून वंचित आहे. या जमातीतील लोक विना कपडय़ांचे जीवन जगत आहेत. या आदिवासी जमातीतील बहुतेक लोक मासेमारी करून उदरनिर्वाह करतात.









