श्रीहरिकोटा येथून उपग्रह होणार प्रक्षेपित : युरोपीय अंतराळ संस्थेचे सहकार्य
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
पीएसएलव्ही-सी59/प्रोबा-3 मिशन उपग्रहांचे प्रक्षेपण बुधवारी संध्याकाळी 4.06 वाजता आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून होणार असल्याची घोषणा इस्रोने केली आहे. या मोहिमेत ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलव्ही)-सी59 सुमारे 550 किलोग्रॅम वजन असलेल्या उपग्रहांना अत्याधिक दीर्घवृत्ताकार कक्षेत नेणार आहे.
प्रोबा-3 मिशन युरोपीय अंतराळ संस्थेकडून (ईएसए) एक ‘इन-ऑर्बिट डेमोन्स्ट्रेशन (आयओडी) मिशन’ आहे. विश्वसनीय पीएसएलव्ही, पीएसएलव्ही-सी59/पीआरओबीए-3 सोबत चमकण्यासाठी तयार आहे. हे ईएसएच्या सहकार्याने इस्रोकडून सक्षम न्यू स्पेस इंडिया लिमिटेडचे एक मिशन आहे. हे मिशन ईएसएच्या प्रोबा-3 उपग्रहांना एका अद्वितीय अत्याधिक अंडाकार कक्षेत स्थापित करणार आहे, हे मिशन जटिल कक्षीय डिलिहरीसाठी पीएसएलव्हीच्या विश्वासार्हतेला मजबूत करणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे.
मिशनचे लक्ष्य अचूक संरचना उड्डाणाचे प्रदर्शन करणे आहे. मिशनमध्ये दोन अंतराळयान सामील आहेत. कोरोनाग्राफ स्पेसक्राफ्ट (सीएससी) आणि ऑकुल्टर स्पेसक्राफ्ट (ओएससी) यांना एकत्रितपणे ‘स्टॅक्ड कॉन्फिगरेशन’मध्ये प्रक्षेपित केले जाणार असल्याचे इस्रोकडुन सांगण्यात आले.
पीएसएलव्ही एक प्रक्षेपक असून तो उपग्रह आणि अन्य विविध पेलोड्सना अंतराळात नेण्यास मदत करतो. हा लिक्विड स्टेजने युक्त असलेला भारताचा पहिला प्रक्षेपक आहे. पहिला पीएसएलव्ही ऑक्टोबर 1994 मध्ये यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला होता. इस्रोनुसार पीएसएलव्हीसी-59 मध्ये प्रक्षेपणाचे चार टप्पे असतील. प्रक्षेपकाकडून उचललेले जाणारे एकूण द्रव्यमान सुमारे 320 टन आहे.
हे मिशन पीएसएलव्हीची विश्वसनीय अचूकता आणि एनएसआयएल, इस्रो आणि ईएसएच्या सहकार्याचे उदाहरण आहे. पीएसएलव्हीने यापूर्वी 1 जानेवारी रोजी एक्सपोसॅट उपग्रहासह झेप घेतली होती. प्रोबा-3 जगातील सर्वात अचूक निर्माण प्रक्षेपण मोहीम आहे. हे सूर्याच्या वायुमंडळाच्या सर्वात बाहेरच्या आणि सर्वात उंच थर सौर कोरोनाचे अध्ययन करणार आहे. या उपग्रहाला एक्सरे पोलरिमीटर सॅटेलाइट देखील म्हटले जाते.









