आचरा | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध 2023 – 24 या परीक्षेत आचरा येथील मृणाल विठ्ठल धुरी व सिंधुदुर्ग सैनिक स्कुल आंबोली येथे शिक्षण घेत असलेल्या याने प्रविण्य प्राप्त केले असून मालवण तालुक्यातून गुणानुक्रमे दुसरा क्रमांक त्याने प्राप्त केला असून यावर्षी होणाऱ्या इस्रो सफरसाठी मालवण तालुक्यातून त्याची निवड झाली आहे. या त्याच्या यशामध्ये त्याचे मार्गदर्शक शिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे. इस्रो सफरसाठी मालवण तालुक्यातून त्याची निवड झाल्याने आचरा ग्रामस्थ, मार्गदर्शक शिक्षक, पालकवर्ग यांनी त्याचे अभिनंदन केले आहे .









