लाँच करून परत आणले जाणार : समुद्रात होणार लँडिंग
वृत्तसंस्था /बेंगळूर
चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणानंतर इस्रोने आता गगनयान प्रकल्पावर लक्ष केंद्रीत केले आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत 3 जणांना तीन दिवसांसाठी अंतराळात पाठविले जाणार आहे. या अंतराळवीरांना 400 किलोमीटरच्या कक्षेत लाँच करुन परत आणले जाईल आणि समुद्रात लँडिंग करण्यात येणार आहे. इस्रोने तामिळनाडूच्या महेंद्रगिरीमध्ये इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये गगनयान सर्व्हिस मॉड्यूल प्रोपल्शन सिस्टीमचे (एसएमपीएस) यशस्वी परीक्षण पेले आहे. गगनयानचे सर्व्हिस मॉड्यूल एक बाय प्रोपेलेंट आधारित प्रोपल्शन सिस्टीम आहे. अंतराळात जाण्यादरम्यान ऑर्बिटल मॉड्यूलच्या गरजा त्याच्याकडून पूर्ण केल्या जातात. यात ऑर्बिट इंजेक्शन, सर्क्युलरायजेशन, ऑन-ऑर्बिट कंट्रोल, एबोर्ट सामील आहे. हॉट टेस्टिंग 250 सेकंदांपर्यंत चालेल. यात परीक्षण प्रोफाइलचे पालन करत आरसीएस थ्रस्टर्ससोबत एलएएम इंजिन्सना कंटीन्यूड मोडवर फायर करण्यात आल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. गगनयान सर्व्हिस मॉड्यूल प्रोपल्शन सिस्टीमला लीक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरने (एलपीएससी) डिझाइन आणि विकसित केले आहे.









