ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ISRO launched 177 foreign satellites between 2018-22 भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने मागील पाच वर्षात 19 देशांचे तब्बल 177 उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले. या व्यावसायिक प्रक्षेपणांमधून इस्रोने 1100 कोटींची (94 दशलक्ष डॉलर्स आणि 46 दशलक्ष युरो) कमाई केली आहे. केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
व्यावसायिक कराराअंतर्गत इस्रो विविध देशांचे उपग्रह लाँच करते. जानेवारी 2018 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत इस्रोने ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, कोलंबिया, फिनलंड, फ्रान्स, इस्रायल, इटली, जपान, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, मलेशिया, नेदरलँड, रिपब्लिक ऑफ कोरिया, सिंगापूर, स्पेन, स्वित्झर्लंड, इंग्लड आणि अमेरिका या 19 देशांचे तब्बल 177 उपग्रह PSLV आणि GSLV-MKIII प्रक्षेपकांनी यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
अधिक वाचा : नाशकात ठाकरे गटाला खिंडार; डझनभर माजी नगसेवक शिंदे गटात सामील
याशिवाय अवकाश उपक्रमांबाबत बिगर-सरकारी संस्थाना प्रोत्साहन देण्याकरिता तसेच त्यांच्या हाताळणीसाठी इन-स्पेस ही एक खिडकी व्यवस्था उभारल्याने याबाबत स्टार्टअप्स क्षेत्रात लक्षणीय रस दिसला. परिणामी, इन-स्पेस डिजिटल मंचावर आतापर्यंत 111 अवकाश स्टार्टअप्सची नोंदणी झाली असल्याचे सिंह यांनी सांगितले.