वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इस्रोने शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या दोन दिवसांच्या समारंभात प्रथमच भारतीय अंतराळ स्थानकाचे (बीएएस) मॉडेल जगासमोर सादर केले. हा समारंभ नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू झाला. ‘बीएएस’ हे भारताचे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित अंतराळ स्थानक असून ते पृथ्वीपासून 450 किलोमीटर अंतरावर लो अर्थ ऑर्बिटमध्ये (एलईओ)s स्थापित केले जाईल. 2035 पर्यंत अंतराळात बीएएसचे पाच मॉड्यूल नेण्याचे इस्रोचे उद्दिष्ट असून या माध्यमातून तेथे एक पूर्ण अवकाश प्रयोगशाळा बनवण्याचा विचार आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून अवकाशातील विविध निरीक्षणे नोंदवण्यात येणार आहेत. ही कामगिरी अवकाश संशोधनात भारताचे स्थान अधिक उंचावणार आहे.









