दमास्कस
इस्रायलने मंगळवारी रात्री उशिरा सीरियाच्या दक्षिण भागांमध्ये एअरस्ट्राइक केला आहे. सीरियातील सैन्यतळ, मुख्यालय आणि शस्त्रास्त्रसाठ्यांना लक्ष्य केल्याचे इस्रायलच्या सैन्याकडून सांगण्यात आले. इस्रायलच्या विमानांनी दमास्कसपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावरील किसवेह शहरावर हल्ला केला आहे. दक्षिण सीरियात शांतता प्रस्थापित करण्याच्या धोरणाच्या अंतर्गत इस्रायलचे सैन्य तेथे कारवाई करत आहे. आम्ही दक्षिण सीरियाला लेबनॉन होऊ देणार नाही असे उद्गार संरक्षणमंत्री इस्रायल काट्ज यांनी काढले आहेत.









