राधानगरी/प्रतिनिधी
इचलकरंजी,ता, हातकणंगले जवाहरनगर येथील जालिंदर अण्णाप्पा सुतार यांचा राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथे नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. मृतदेह इतका सडलेला होता की त्याची ओळख पटवणे अशक्य होते. खिशातील आधार कार्ड आणि वीजबिलावरून राधानगरी पोलिसांनी अखेर व्यक्तीची ओळख पटवली.
आज सोमवारी सकाळी दुर्गमानवाड येथील मेहेर नावाच्या शेतात झाडाला नायलॉनच्या दोरीने फास लावलेल्या अवस्थेत मृतदेह निदर्शनास आला होता. दुर्गमानवडचे पोलीस पाटील पांडुरंग गुरव यांना माहिती मिळताच राधानगरी पोलिसात वर्दी दिली. राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता. सडलेल्या अवस्थेतील मृताच्या खिशात आधार कार्ड आणि लाईट बिल निदर्शनास आले. आधार कार्डावरून पोलिसांनी मृताची ओळख पटवली.यापूर्वी इचलकरंजी पोलीस स्टेशनमध्ये मृत व्यक्ती बेपत्ता असल्याची फिर्याद नोंद झाली होती.उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.









